गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत धनादेशाचे वाटप*
बेळगाव
बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट ने ब्राह्मण समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क ट्रस्टमार्फत दिले जाते.
या पार्श्वभूमीवर, बुधवार 3 रोजी सायंकाळी 5 वाजता फाउंड्रीक्लस्टर येथे धनादेश वितरण समारंभ होणार आहे.

ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री राम भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
उपाध्यक्ष श्री.भरत देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव विलास बदामी यांनी केले आहे
