बेंगळुरू
सीमाभागातील बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी या दोघांच्या सदस्यत्व रद्दबातल करण्याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
हायकोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारकडील वकिलांनी हरकती सादर करण्यासाठी वेळ मागितला.
त्यामुळे कोर्टाने या दोघांच्या सदस्यत्वाला दिलेल्या स्थगिती आदेशाची मुदत येत्या 28 तारखेपर्यंत वाढवली आहे.
या प्रकरणात महापौरांच्या वतीने हायकोर्टातील शांतनगौडा आणि बेळगावचे ज्येष्ठ वकील रवीराज पाटील यांनी युक्तिवाद केला.
यापूर्वी हायकोर्टाने 7 तारखेपर्यंतच स्थगिती दिली होती. त्याआधी बेळगाव प्रादेशिक आयुक्तांचा आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या न्यायालयाने थांबवला होता. त्याविरोधातच ते हायकोर्टात गेले होते.

