बेळगाव आमदार अभय पाटील यांचे होळी मिलन. रंगांचा उत्सव – संस्कृतीचे प्रतिबिंब’

बेळगाव:
रंगांचा सण होळी म्हणजे केवळ पाणी, गुलाल, आनंद, गाणी आणि हास्यस्फोट एवढेच नव्हे, तर तो समाजातील एकता, मैत्री आणि समता यांचे प्रतिबिंब आहे!

बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील गेल्या 16 वर्षांपासून साजरा करत असलेले ‘होळी मिलन’ हा जात, भाषा यापलीकडे जाऊन नागरिकांना एकत्र आणणारा उत्सव बनला आहे.
केवळ बेळगावच नव्हे, तर कर्नाटकी आणि मराठी संस्कृतीच्या संगमाचे प्रतीक म्हणूनही हा उत्सव ओळखला जातो. त्यामुळेच दरवर्षी या कार्यक्रमात 20 हजारांहून अधिक लोक सहभागी होतात, हे विशेष!

या होळी मिलनमध्ये कोणत्याही वयाचे बंधन नाही, ना जात, ना भाषा – केवळ रंग, उत्साह आणि एकतेचा उत्सव! त्यामुळे हा कार्यक्रम दोन संस्कृतींचा खरा संगम म्हणता येईल.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात आपल्या अनोख्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आमदार अभय पाटील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो येथे आयोजित या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण बेळगावला एका रंगाच्या छायेत रंगवतात.


पूर्वी कसे होते?

सीमावर्ती बेळगावमध्ये पूर्वी अशा भव्य होळी उत्सवांचे आयोजन होत नसे.
होळी आली की, पोलिसांना एका प्रकारची काळजी लागायची, कारण त्या काळात असामाजिक घटकांची दहशत होती.

पण आता होळी म्हणजे ‘नो टेन्शन फक्त सेलिब्रेशन’ असे समीकरण तयार झाले आहे!
2009 पासून आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘होळी मिलन’ मध्ये हजारो लोक एकत्र येत असले तरी कुठलाही अनुचित प्रकार होत नाही.
सर्व जण रंगांच्या सरीत भिजून गाण्यांच्या तालावर नाचताना दिसतात.

या पार्श्वभूमीवर ‘होळी मिलन’ हा कार्यक्रम सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्य वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अभय पाटील यांचा हा उपक्रम लोकांना जोडणारा, संस्कृतीला बळ देणारा आणि खऱ्या अर्थाने उत्सवाला नवसंजीवनी देणारा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!