
मोबाईल ऐवजी मुलांना संस्कार द्या
उपमहापौर वाणी जोशी : शाहूनगरला आध्याज स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
बेळगाव, ता. 29 : आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मुलांना संस्कार आणि आपले भारतीय खेळ शिकवणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या हाती मोबाईल देण्यापेक्षा त्यांना संस्कार द्या, असे मनोगत बेळगावच्या उपमहापौर वाणी विलास जोशी यांनी व्यक्त केले.
शाहूनगर एमजी रोड येथील आध्याज प्ले कॉर्नरचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. यावेळी उपमहापौर जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर प्रभाग 34 चे नगरसेवक श्रेयस नाकाडी, श्री गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र सावनुर, उपाध्यक्ष अरविंद अष्टेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता सूर्यवंशी, कमिटी मेंबर संजय सूर्यवंशी होते.
श्रीमती जोशी म्हणाल्या की, आपण जुने खेळ पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आजच्या पिढीला ते नव्याने शिकवण्याची गरज आहे.

आजीहाआजोबांसोबत गोष्टी सांगण्याची गरज आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हे दरवर्षी चिखलातील तसेच अन्य भारतीय खेळांच्या स्पर्धा आयोजित करतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाईल देण्याऐवजी संस्कार द्या, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक श्रेयस नाकाडी व संजय सूर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक संजय सूर्यवंशी यांनी केले. अध्याय स्कूलच्या वर्षभराच्या उपक्रमांचा आढावा व अहवाल वाचन हेमलता सूर्यवंशी यांनी केले.

शिक्षिका वर्षा नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर प्ले ग्रुप ते युकेजीच्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. गेल्या वर्षभरात विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मुलांचा पदक व प्रमाणपत्र देऊन उपमहापौर, नगरसेवक व अन्य पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षिका अनुराधा कुंभार यांनी आभार मानले.
पालकांच्या मागणीनुसार क्लासेस