
७ कोटींच्या करचुकवेगिरीचा प्रकार लोकायुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला
बेळगाव शहरातील एका खासगी कंपनीशी संबंधित सुमारे ७ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर चुकवेगिरीचा प्रकार आता लोकायुक्त कार्यालयाच्या पातळीवर गेला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी यांनी दिनांक ५ जुलै रोजी बेळगाव लोकायुक्त पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. या पत्रात महापालिका सभागृहात पारित झालेल्या ठरावाचा आणि व्हेगा कंपनीच्या करचुकवेगिरीशी संबंधित पुराव्यांचा उल्लेख आहे….