बेळगाव:
शहरातील प्रसिद्ध श्री मंगाई जत्रेच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या स्वागत बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील भाजप नगरसेवकांच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे.

महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि सत्तारूढ पक्षनेते हनुमंत कोंगळी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरेसे यांना निवेदन दिले.
जत्रेदरम्यान अशा प्रकारे शांतता भंग करण्याचे काम खोडसाळ मंडळी करत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना शोधून कारवाई करावी, अशी मागणी प्रतिनिधी मंडळाने केली.

आयुक्तांनी या संदर्भात आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
गिरीश धोोंगडी, जयंत जाधव आणि इतरजण या वेळी उपस्थित होते.