बेळगावः
ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वितरणाप्रसंगी राम भंडारे, विलास जोशी, अनुश्री देशपांडे आदी.

बेळगाव,ता.३ ः आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे यांनी दिले.उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात ट्रस्टतर्फे ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण धनादेश स्वरुपात बुधवारी (ता.३) करण्यात आले. याप्रसंगी श्री भंडारी बोलत होते.
ब्राह्मण समाज ट्रस्टच्या उद्देशानुसार आमचे कार्य सुरू आहे. शिक्षणासाठी आर्थिक मदतीची मागणी केलेल्यांना ट्रस्टने मदत दिली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रस्टचे प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मणांनी संघटित होण्याची गरज असून ब्राह्मण समाज ट्रस्टच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही श्री भंडारे यांनी केले.
ट्रस्टचे सचिव विलास बदामी, सहसचिव विलास जोशी,कोषाध्यक्ष रमेश कुलकर्णी, नगरसेविका वाणी जोशी, माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.
…………….