आमदार अभय पाटील यांची सायकल फेरी
बेळगाव
सीमाभागातील बेळगावमध्ये आपल्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले भाजप आमदार अभय पाटील सायकलवर बसून मतदारांच्या घरी पोहोचत आहेत.
दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डमध्ये सायकलने जाऊन मतदारांच्या घराच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या ऐकण्याचे काम ते करत आहेत.

आज वॉर्ड क्रमांक 43 आणि 29 मध्ये फेरफटका मारून त्यांनी मतदारांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या वेळी कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अडचणींसंदर्भात नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली मते मांडली.

वॉर्ड क्रमांक 43 च्या नगरसेविका वाणी जोशी आणि वॉर्ड क्रमांक 29 चे नगरसेवक नितीन जाधव, जयंत जाधव यांसह अनेक लोक या वेळी उपस्थित होते.