बेळगाव:
नवीन निवडून आलेले महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी विलास जोशी यांनी आज पदभार स्वीकारला.
निवड झालेल्या दिवसापासूनच या दोघांनीही त्यांच्या निवडीस सहकार्य करणाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त करण्याचे कार्य केले.

आज सकाळीही पक्षाच्या अनेक मान्यवरांना भेटल्यानंतर महापौर आणि उपमहापौर महापालिकेत प्रवेश केले.

लक्षवेधी बाब म्हणजे, महापालिकेत प्रवेश करण्यापूर्वी दोघांनीही प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांना वंदन करून आत प्रवेश केला.

यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि आपल्या कार्यालयात प्रवेश केला.
या पदभार स्वीकृती समारंभास नगरसेवक उपस्थित होते.
