शिवजयंती मिरवणुकीत माणुसकीचा थंडावा: Mla Abhay Patil सेवाभावाचं स्पर्श”

शिवजयंती मिरवणुकीत माणुसकीचा थंडावा: साहेबांचं सेवाभावाचं स्पर्श”

बेळगाव:
बेळगावच्या रस्त्यांवर फडकणारे केशरी ध्वज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषवाक्यांनी आसमंत दुमदुमलेला, आणि संस्कृतीचा सुवर्णप्रकाश पसरवणारी मिरवणूक…
याच भव्यतेमध्ये एक दृश्य असंही होतं, ज्याने बेळगावकरांच्या मनाला थेट भिडणारा अनुभव दिला.

शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो शिवभक्तांच्या तहान भागवण्याचं काम आ. अभय पाटील यांनी केलं.
त्यांच्या पुढाकाराने ‘मोफत पाण्याच्या पाकिटांचं वितरण’ या मिरवणुकीत विशेष लक्ष वेधून घेतलं.
कदाचित ही सेवा लहान वाटेल, पण ही एक अशी हृदयस्पर्शी कृती होती, जी भक्तीचा उन्माद आणि सामाजिक संवेदनशीलतेला एकत्र आणणारी ठरली.

“छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेच्या हितासाठी लढणारे राजा होते. आपणही त्यांच्या मार्गदर्शनात जनकल्याणासाठी असे उपक्रम हाती घ्यायला हवेत,” असं अभय पाटील यांनी सांगितलं.

ही केवळ पाण्याची व्यवस्था नव्हे, तर ती त्यांच्या आत्मीयतेचं आणि महाराजांच्या मूल्यांना वाहिलेलं प्रत्यक्ष स्मरण होतं.

मिरवणुकीदरम्यान उपमहापौर वाणी विलास जोशी यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत पाण्याची पाकिटं वाटताना दिसले, हे दृश्य नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेणारं ठरलं.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!