Headlines

नेकरांच्या जगण्यात प्रकाश यावा – कागदावरच न राहणारी धोरणं करा”

मंत्रीांच्या बैठकीत आमदार अभय पाटील यांचा आवाज
“नेकरांच्या जगण्यात प्रकाश यावा – कागदावरच न राहणारी धोरणं करा”

बेळगाव, १२ सप्टेंबर –
“नवीन वस्त्रोद्योग धोरण फक्त कागदावरच राहू नये. ते नेकरांच्या जगण्याला उजाळा देणारं नवं उद्योगमार्गदर्शक ठरलं पाहिजे,” अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सरकारकडे केली.

बेंगळुरूमध्ये वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आमदार पाटील यांनी सर्वंकष निवेदन सादर करताना नेकरांचे दुःख–व्यथा आणि अपेक्षा यांचं स्पष्ट चित्रण मांडलं.
“बेळगाव तालुक्यात दहा हजारांहून अधिक पॉवरलूम आहेत, त्यापैकी ८,७३२ माझ्या मतदारसंघात आहेत. त्यांची थेट स्थिती मला ठाऊक आहे,” असं त्यांनी बैठकीत स्पष्ट केलं.

निवेदनाचे ठळक मुद्दे

नेकर मंडळ रचना : वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेकर प्रतिनिधी आमदारांसह मंडळ तयार करावं. सर्व युनिट्समधून सेस वसूल करून शिक्षण, आरोग्य, अपघात विमा आणि सामाजिक सुरक्षा पुरवावी.

परवानगी शिथिलीकरण : पॉवरलूममध्ये फक्त ध्वनी प्रदूषण होत असल्याने जर ध्वनिनियंत्रण तंत्रज्ञान बसवलं तर पर्यावरण विभागाकडून मंजुरीची गरज नसावी. वस्त्रनिर्मिती उद्योगालाही हाच अपवाद लागू व्हावा.

अनुदान योजना :

सौर प्रकल्पांना ७५% अनुदान.

२५ लाख खर्चाच्या रेपिअर–जकार्ड पॉवरलूमसाठी ५०% मदत.

इमारत असूनही फक्त यंत्र खरेदी करणाऱ्या नेकरांनाही ७५% अनुदान मिळावं.

जमीन नियम बदल : वस्त्रोद्योग पार्कसाठी सध्या आवश्यक १५ एकरांऐवजी ५ एकर पुरेसे. ग्रामीण–शहरी भेद न करता लहान उद्योगांना परवानगी द्यावी.

केंद्र–राज्य योजना समन्वय : पंतप्रधान रोजगार योजनांसह केंद्र सरकारच्या लाभार्थींनाही राज्य सरकारचं अनुदान मिळावं.

आत्महत्या प्रतिबंध : बेळगाव दक्षिणेत २२ हून अधिक नेकरांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष पुनर्वसन योजना करावी.

जमिनीचं कायदेशीरकरण : बांडावर कागदी खरेदी केलेली घरे–जमिनी तातडीने कायदेशीर करून नेकर कुटुंबांना शासनाच्या सुविधा पोहोचाव्यात.

सबलिकरणाचं नवं उद्योगमार्गदर्शन”

आपल्या भाषणात पाटील म्हणाले,
“वस्त्रोद्योग धोरण हे फक्त उद्योगविस्ताराचं दस्तऐवज न राहता, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या नेकरांना सबल करण्याचं मार्गदर्शक ठरलं पाहिजे. नेकरांच्या जीवनाला उजेड देणं हीच या धोरणाची खरी फलश्रुती आहे.”

या बैठकीत बेळगावचे नेकर नेते संतोष टोपगी, बसवराज कामकर, विनायक कामकर, गजानन गुंजेरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!