बेळगावात अखंड राजकीय युद्ध
‘बुडा आयुक्तांविरोधात नगरसेवकाचे पत्र’
बेळगाव.
सीमाभागातील बेळगावातील पाऊस थांबला पण भाजप आणि काँग्रेस मधील संघर्ष कमी होण्याची चिन्हे नाहीत.
बेळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 46 मधील रामतीर्थ नगर येथील पथदिव्यांच्या उद्घाटनावरून आता नवा संघर्ष सुरू झाला आहे. या पथदिपांचे दुसऱ्यांदा उद्घाटन झाल्याची तक्रार नगरसेवक हनमंत कोंगाळी यांनी केली आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याची त्यांची तक्रार आहे. कोंगाळी हे बेळगाव नगर विकास प्राधिकरण तथा बुडाचे नामनिर्देशित सदस्यही आहेत. कोंगाळी यांच्याच प्रभागात पथदिपांचा उद्घाटन कार्यक्रम झाला. त्यामुळे त्या हनुमंता कोंगाळी यांना निमंत्रित केले जाणे आवश्यक होते.

पण त्यांना निमंत्रण न देताच उद्घाटन कार्यक्रम उरकण्यात आला. त्यामुळे कोंगाळी यांनी बुडा आयुक्त शकील अहमद यांच्या विरोधात बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. शिष्टाचारानुसार त्या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रित केले जाणे आवश्यक होते. पण मला निमंत्रित न करता कार्यक्रम केल्याने हक्कभंग झाल्याची कोंगाळी यांची तक्रार आहे

कोंगाळी आणि दिलेल्या तक्रारीनुसार, 2023 मध्ये बुडा कार्यक्षेत्रातील रामतीर्थ नगरच्या गणेश गणेश सर्कल व बसवेश्वर कॉलनी येथे सजावटीच्या पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. तत्कालीन आमदारांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम झाला होता त्यावेळी कोंगाळे यांनाही बोलावण्यात आले होते. आता काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू सेठ यांच्या हस्ते पुन्हा त्याच पथदिपांचे उद्घाटन करण्यात आल्याची कोन गाडी यांची तक्रार आहे. त्या उद्घाटन कार्यक्रमाला कोंगाळी यांना निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे ते नाराज झाले आहेत व त्यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. मी केवळ नगरसेवकच नाही तर बुडाचा नामनिर्देशित सदस्यही आहे, तरीही जाणीवपूर्वक मला आमंत्रित केले नाही असे कोण गाडी यांनी पत्रात नमूद केले आहे. बुडा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेमुळे मला वैयक्तिक त्रास तर झाला आहेच शिवाय माझा स्वाभिमानही दुखावला आहे. यामुळे शिष्टाचाराचेही उल्लंघन झाले असून बुडाच्या पुढील बैठकीत हा विषय मांडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी बुडा अध्यक्षांकडे केली आहे . त्यामुळे भाजप व काँग्रेस मधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.