बेळगाव शहराला Citiis-2 योजनेअंतर्गत ₹135 कोटी अनुदान
बेळगाव: नगरविकास मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते, Citiis-2 योजनेअंतर्गत बेळगाव शहरासाठी ₹135 कोटी अनुदानाच्या चतुर्भुज करारावर सह्या झाल्या. राजस्थानच्या जोधपूर येथे हा कार्यक्रम पार पडला. या करारावर बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभ बी. आणि स्मार्ट सिटीचे एम.डी. यांनी सह्या केल्या. केयूआयडीएफसी, बंगळूर यांचे व्यवस्थापकीय संचालक शरत, आय.ए.एस. यांच्या उपस्थितीत या योजनेला सुरुवात करण्यात आली.

हे अनुदान कर्नाटक राज्यातील केवळ बेळगाव शहरासाठी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट (SWM) योजनेसाठी देण्यात आले आहे. यामुळे शहराच्या कचरा व्यवस्थापन प्रणालीला अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्याचा उद्देश आहे.
या समारंभात 10 पेक्षा अधिक राज्यांचे नगरविकास मंत्री, 20 पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी आणि 100 पेक्षा अधिक आय.ए.एस. अधिकारी उपस्थित होते. या महत्त्वाच्या कार्यक्रमात बेळगाव शहराला विशेष ओळख मिळाली.

या योजनेमुळे शहराच्या सतत विकासासाठी आणि पर्यावरणास अनुकूल कचरा व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे.