Headlines

बेळगावमध्ये ब्राह्मण संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार

बेळगावमध्ये ब्राह्मण संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार

बेळगाव जिल्ह्यात ब्राह्मण संघटनांना अधिक मजबुती देण्याच्या दिशेने जिल्हा ब्राह्मण सभा ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शहरातील फाउंड्री क्लस्टरमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष राम भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टच्या कार्याचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करण्यासोबतच अधिकाधिक सदस्यांची भर घालून समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.

Ram bhandare president

यासोबतच, मागील वेळीप्रमाणेच यंदाही समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय, एप्रिल महिन्यात होणाऱ्या अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या निवडणुकीबाबतही गांभीर्याने चर्चा झाली. ट्रस्टचे उपाध्यक्ष भरत देशपांडे यांनी या विषयावर प्रस्ताव मांडला. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अशोक हारनहळ्ळी समर्थित उमेदवार वि. भानुप्रकाश शर्मा यांना पाठिंबा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Bharat Deshpande. Vice President

बेळगाव जिल्हा प्रतिनिधीपदासाठी माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे यांना उमेदवार म्हणून उतरवण्यास सर्वांनी संमती दर्शवली. तसेच, हा निवडणूक बिनविरोध पार पडावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे भरत देशपांडे यांनी आवाहन केले.

याशिवाय, ब्राह्मण ट्रस्टची अधिकृत वेबसाईट तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

या बैठकीस ट्रस्टचे खजिनदार राजशेखर तळेगाव, संयुक्त कार्यवाह विलास जोशी, अनुश्री देशपांडे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!