Headlines

बेळगाव स्वच्छतेसाठी दंडाचा चाबूक

एका महिन्यात २ लाख रुपयांचा दंड वसूल!

सकाळी ६ ते रात्रीपर्यंत नजर ब्लॅक स्पॉट्सना ब्रेक
बेळगाव:
सीमावर्ती बेळगाव शहरात स्वच्छतेबाबत आता केवळ शब्दांवर भर नाही. महानगरपालिकेने थेट दंडात्मक कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.
कचरा वर्गीकरण न करणारे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे तसेच ब्लॅक स्पॉट निर्माण करणाऱ्यांविरुद्ध राबवलेल्या कठोर कारवाईत अवघ्या एका महिन्यात २ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
ही दंडात्मक मोहीम सकाळी ६ वाजल्यापासून रात्रीपर्यंत सातत्याने सुरू असून, यामुळे महानगरपालिकेची गांभीर्यपूर्ण भूमिका स्पष्ट होते.
घराघरात भेटी – ऐकले नाही तर दंड
महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, वाहनचालक, लोडर, पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, कम्युनिटी मोबिलायझर्स गेल्या तीन महिन्यांपासून रविवारी तसेच सर्व शासकीय सुट्ट्यांमध्येही या मोहिमेत कार्यरत आहेत..

सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत घराघरात भेट देऊन कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली जाते. प्रथम विनंती, नंतर नोटीस आणि तरीही नियमभंग सुरू राहिल्यास तत्काळ दंड — अशी टप्प्याटप्प्यांची कारवाई महानगरपालिका राबवत आहे.
ब्लॅक स्पॉट्सना ब्रेक…
पालिकेच्या विनंती व नोटिसांकडे काही जण दुर्लक्ष करत असल्याने, रात्रीच्या वेळेतही स्वच्छता कर्मचारी व वॉच पथके नजर ठेवून दंड आकारत आहेत.
रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे, ब्लॅक स्पॉट निर्माण करणे, कचरा वर्गीकरण नियमांचे उल्लंघन — अशा सर्व प्रकरणांत स्पॉट फाइन आकारला जात आहे.
कठोर कारवाई

महानगरपालिका सूत्रांनुसार, दंड हा शेवटचा पर्याय आहे. मात्र स्वच्छतेसाठी तो अनिवार्य ठरत आहे.
महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी तसेच महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या निर्देशानुसार कोणतीही शिथिलता न ठेवता कठोर कारवाई सुरू आहे.

Oplus_16908288

जनतेकडून चांगला प्रतिसाद
शहर स्वच्छतेच्या बाबतीत महानगरपालिकेने केवळ दिखाऊ कारवाई केलेली नाही. दंडात्मक मोहीम सुरू झाल्यानंतर अनेक प्रभागांमध्ये कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढले असून ब्लॅक स्पॉट्सची संख्या घटली आहे.
दंड वाढताच जनजागृतीही वाढली आहे. नागरिकांचा प्रतिसाद सकारात्मक आहे.
— *एम. कार्तिक, आयुक्त, महानगरपालिका, बेळगाव.*

Oplus_16908288

दंड हा शेवटचा मार्ग
प्रथम जनजागृती, त्यानंतर नोटीस. सर्व प्रयत्नांनंतरही नियमभंग झाल्यास दंड अपरिहार्य आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही.
— *हनुमंत कलादगी,
पर्यावरण अभियंता, महानगरपालिका, बेळगाव.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!