बेळगावमध्ये ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान ‘सत्यामृत महोत्सव’


श्री सत्यात्मतीर्थ श्रीपादांच्या ५३व्या संवत्सर पूर्तीनिमित्त पाच दिवसांचे धार्मिक कार्यक्रम
बेळगाव:
श्री सत्यात्मतीर्थ श्रीपादांच्या ५३व्या संवत्सराची पूर्तता होत असल्याच्या निमित्ताने, बेळगावच्या राणी चन्नम्मा नगर येथील श्री सत्यप्रमोदतीर्थ सभागृहात ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान ‘सत्यामृत महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.
या पाच दिवसांच्या महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक तसेच भक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पहिल्या रेल्वे गेटपासून सभागृहापर्यंत दुचाकी मिरवणुकीसह भव्य स्वागत कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर महिला भजना मंडळांकडून पूर्णकुंभ स्वागत केले जाईल. सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन, पंडितांचे प्रवचन तसेच श्रीपादांचे अनुग्रह संदेश होणार आहेत.
भजन, प्रवचन व संगीत कार्यक्रम
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत भजना मंडळांकडून भजन होईल. सायंकाळी ६ वाजता पंडितांचे प्रवचन व श्रीपादांचा अनुग्रह संदेश असेल.

१३ फेब्रुवारी रोजी एकादशीच्या दिवशी दुपारी ३ ते ५.३० या वेळेत महिला मंडळांकडून भजन होणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पंडित रवींद्र कातोटी यांचा संगीत कार्यक्रम होईल. त्यानंतर पंडितांचे प्रवचन व श्रीपादांचे अमृतोपदेश होणार आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत भजन होईल. सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत गुरूंना शेषवस्त्र अर्पण कार्यक्रम होणार असून, त्यानंतर प्रवचन व अमृतोपदेश होतील.

मृत्युञ्जय होम व अभिषेक
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ८ या वेळेत मृत्युञ्जय होम, तर ८ ते ९ या वेळेत विविध नद्यांतून आणलेल्या तीर्थाने श्रीपादांचा अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर संस्थान पूजा सुरू होईल. सर्व भाविकांसाठी तीर्थप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पादपूजा व मुद्राधारणेचा कार्यक्रम
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री सत्यप्रमोदतीर्थ सभागृहात पादपूजा व मुद्राधारणेचा कार्यक्रम होईल.

१३ फेब्रुवारी रोजी एकादशीच्या दिवशी केवळ मुद्राधारणा होणार असून वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
सकाळी ८ ते ९: श्री वेंकटेश मंदिर, मार्केट
९ ते १०: श्री वेंकटेश मंदिर, वडगावी
१० ते १०.३०: उत्तरादिमठ, शाहापूर
११ ते १: श्री सत्यप्रमोदतीर्थ सभागृह, राणी चन्नम्मा नगर
पादपूजा करण्याची इच्छा असलेल्या भाविकांनी माळा, फळे, नारळ आदी आवश्यक पूजासामग्री सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांनी वेळेवर उपस्थित राहून शांततेने रांगेत उभे राहून सहकार्य करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!