
आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली – वार्ड क्र. ४३ मध्ये ಅದೇनवी पाणी व्यवस्था.
बेळगाव : शहरातील वार्ड क्रमांक ४३ मधील रहिवाशांना सतत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अखंड पाणीपुरवठा व्यवस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रत्यक्षात आली असून वार्डातील रहिवाशांना दिवसाचे २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत शहरातील चिदंबरनगर आणि परिसरातील भागांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यात येत असून घराघरांपर्यंत सातत्याने शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. यामुळे पाण्याची कमतरता तसेच अनियमित पुरवठ्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, अशी माहिती उपमहापौर वाणी जोशी यांनी दिली.

या संदर्भातील कार्यक्रम दि. १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिदंबरेश्वर मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व वार्डातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

